Advertisement

शेअर मार्केटच्या नावाखाली ₹३.२२ लाखांची फसवणूक | Fraud of ₹3.22 lakh in the name of stock market


शेअर मार्केटच्या नावाखाली ₹३.२२ लाखांची फसवणूक


कन्हान : -  सोशल मीडिया फेसबुकवर बनावट शेअर मार्केट जाहिराती देऊन, ऑनलाइन युक्त्या शिकवून आणि गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून एका तरुणाची ३ लाख २२ हजार ६०० रुपयांची फसवणूक झाली.  बलदेव गोपाळ कुंभलकर (३७) रा.तुकाराम नगर,कन्हान असे तक्रारदाराचे नाव आहे. 


बलदेव चे तारसा रोडवर संगणकाचे दुकान आहे . दुकानातून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने त्याने मे २०२५ पासून शेअर मार्केटची माहिती घेण्यास सुरुवात केली . फेसबुकवर शेअर मार्केटशी संबंधित जाहिराती पाहण्यास सुरुवात केली . 

जाहिरातीत वापरलेल्या शेअर बाजार तज्ञाच्या चेहऱ्यावर विश्वास ठेवून , तो १४ जून २०२५ रोजी जाहिरातीत दाखवलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शामील झाला . पहिल्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव 'फेथ अॅडव्हान्समेंट सोसायटी व्हीआयपी सीजे ९' आणि दुसऱ्या ग्रुपचे नाव 'एम ८६१-३६१ व्हॅल्युएशन अँड ग्रोथ ऑब्झर्व्हेशन' होते . 

त्यांच्या सूचनेनुसार फॉर्म भरून बलदेवने नोंदणी केली . सुरुवातीला त्याने १००० रुपये रिचार्ज केले आणि ट्रेडिंग सुरू केले . पहिल्यांदाच क्रीसेक लिमिटेडचा आयपीओ २,५३,८५७ रुपयांचा होता . बलदेवने नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले आणि बँकेतून एनईएफटीद्वारे १,६२,५०० रुपये दिले . क्रीसेक लिमिटेडचे शेअर्स विकल्यानंतर बलदेवने १२.७४ लाख रुपयांच्या निधीच्या कमतरते बद्दल सांगितले . 

यावर बलदेवला आपली फसवणूक झाल्याचा संशय आला . त्यानंतर तो कन्हान पोलिस ठाण्यात गेला आणि मंगळवार (दि.५) ऑगस्ट रोजी फसवणुकीची तक्रार दाखल केली .

कन्हान पोलिसांनी यूटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे इम्तियानुर रहमान, करण भगत आणि सान्या कपूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान हे करीत आहे .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या